

Farmer Suicides Maharashtra
esakal
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या हा अजूनही न सुटलेला गंभीर प्रश्न आहे. आजपर्यंत विविध प्रकारच्या सत्ताधाऱ्यांनी त्या रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या, मात्र त्यास अपेक्षित यश मिळालेले नाही. आजही राज्यात शेतकरी आत्महत्या करतच आहेत. शेती कर्जमाफी, नुकसान भरपाई, विमा, अनुदाने, शेतकरी सन्मान निधी यासारख्या सरकारी उपाययोजना राबवूनही शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. याचाच अर्थ शेती व्यवसाय तोट्यात असून, तो काही केल्या नफ्यात यायला तयार नसल्याचेच दिसते. यावरून या आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना या वरवरची मलमपट्टी तर नाही ना, असा प्रश्न पडतो. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांच्या मुळाशी जाऊन परिणामकारक उपाययोजना राबविण्यासाठी धोरणात्मक विचार आवश्यक आहे.