
जयवंत चव्हाण
jaywantnchavan@gmail.com
अलाहाबादमध्ये कुंभमेळा सुरू आहे आणि कोट्यवधी भाविक तिच्या तीरावर स्नानासाठी जमले आहेत. येत्या ४५ दिवसांत लाखो लोक स्नान करणार आहेत. पवित्र गंगा नदी हा भाविकांच्या आस्थेचा विषय आहे. केंद्रातील मोदी सरकारने गंगा स्वच्छतेसाठी विशेष ‘नमामी गंगे’ हा प्रकल्प सुरू केला.
त्यासाठी आतापर्यंत सुमारे ४० हजार कोटी निधी खर्च झाला आहे. मात्र, गंगेचे पाणी काही शुद्ध, निर्मळ झालेले नाही. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने हे पाणी स्नानासाठी घातक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या पाण्यातून अधिक आजार पसरू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर गंगेच्या सद्यस्थितीबाबत जलपुरुष, नदी अभ्यासक डाॅ. राजेंद्र सिंह यांच्याशी साधलेला संवाद...