
अरविंद जगताप
jarvindas30@gmail.com
जीव वाचवण्यासाठी प्राण्यांनी धडपडणं काही गैर नाही; पण माणसं आपली संपत्ती, नोकरी वाचवण्यासाठी वाटेल ती धडपड करू लागतात तेव्हा वाईट वाटतं. प्राण्यांच्या गोष्टी लिहिल्या गेल्या त्या माणसाने त्यातून काही बोध घ्यावा म्हणून. पण आपण त्यातून मनोरंजन घेतलं...
जुन्या गोष्टी नाहीत. मेंढरं किंवा जनावरं चरणाऱ्यासोबत सहसा एक कुत्रा असायचा. अजूनही असतो. तर मेंढरं त्या कुत्र्याच्या धाकाने सरळ चालत असतात. एखादं कळप सोडून बाहेर जाऊ लागलं, की कुत्रा त्याच्यावर जोरजोरात भुंकणार हे ठरलेलं.