
अरविंद जगताप
jarvindas30@gmail.com
एका आजीची गोष्ट आठवते. तिची सुई हरवली होती. ती रस्त्यात शोधत होती. लोक विचारत होते. आजी रस्त्यात असलेल्या लाइटच्या खांबाखाली सुई शोधत होती. एकाने विचारले, सुई नेमकी कुठे हरवली. आजी म्हणाली, घरात. मग त्याने विचारलं, बाहेर का शोधते? आजी म्हणाली, बाहेर लाइट आहे म्हणून. आता ही गोष्ट चुकीची वाटली सगळ्यांना. जर सुई घरात हरवली तर ती घरात शोधली पाहिजे ना; पण आपणही असंच करतोय. कुठल्यातरी बुवाकडे उत्तर शोधतोय...
बहुतेक माणसं लोकांना काहीतरी सांगत असतात. तोंडात तंबाखू असलेली माणसं व्यसनमुक्तीबद्दल शिकवत असतात. शिवराळ भाषेत बोलणारे नेते सभ्यतेवर भाषण देत असतात. महागाईबद्दलही लोक असंच हवेत बोलत असतात. ते अर्थतज्ज्ञ असतात; पण बाकी सगळे व्यर्थ तज्ज्ञ आपल्या वाट्याला येत असतात. जे दोन्ही बाजूंनी बोलत असतात.