
महाराष्ट्रामध्ये आजकाल कौटुंबिक आणि आप्तजनांमधील संबंधांमध्ये फूट पडण्याच्या अनेक दुर्दैवी घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी मुस्कान नावाच्या महिलेने आपल्या पतीची हत्या केली, कालच पुण्यात एका नवऱ्याने पत्नीचा जीव घेतला, एका व्यक्तीने आपल्या ११ वर्षांच्या मुलाची हत्या केली. ज्या नात्यांनी एकमेकांना जिवापाड सांभाळायचे, आधार द्यायचा, तीच नाती आता हिंसा आणि मृत्यूच्या बातम्यांमधून समोर येताना दिसतात.
पती-पत्नीमधील वाद असोत, कुटुंबातील कलह असोत किंवा प्रेमसंबंधांमधील कटुता, या नात्यांमध्ये नेमकं काय बिघडलंय? लोकांमध्ये इतका असंतोष आणि राग का वाढतोय? फक्त जवळच्या व्यक्तींबद्दल असलेली प्रेमाची भावना ओसरतीये की आजची नातीच तकलादू झालीयेत? या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे कारण ही रुक्षता फक्त वैयक्तिक नाही तर सामाजिक पातळीवर दिसू लागलीये. महाराष्ट्रासारख्या राज्यातल्या या घटनांचं प्रमाण खूप चिंताजनक आहे.