
विलास शिंदे
विविधतेत एकता ही भारताची ओळख नाशिक जिल्ह्याला बरोबर लागू पडते. नाशिक जिल्ह्यात १५ तालुके आहेत, आणि ते मुख्यतः तीन भागांत विभागलेले आहेत. मात्र या तीन भागांतील भौगोलिक रचना, जमीन, पीकपद्धती, वातावरण यामध्ये जमीन-अस्मानाचे अंतर आहे. जिल्ह्यात पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या आदिवासीबहुल तालुक्यांत एकूण ९७८ गावे येतात. या भागात मुख्यत्वे भात, नागली, आंबा ही पिके घेतली जातात.