
यावर्षीच्या ‘फादर्स डे’ची थीम आहे ‘Fathers: Nurturing Resilience and Shaping Futures’ म्हणजेच ‘परिस्थितीनुसार लवचिकता दाखवत भविष्य फुलवणे’ हा मंत्र जपणारे बाबा! म्हणजेच बाबांवर फक्त कुटुंबाचा आर्थिक भार पेलण्याची नव्हे, तर मुलांच्या भावनिक वाढीची, त्यांना सकारात्मक वृत्तीने आयुष्याकडे पाहता येईल, असा विश्वास निर्माण करण्याचीही वाढीव जबाबदारीदेखील आहे.