
सुशील जाधव, पुणे विभागीय प्रमुख, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड
येत्या काळात संपूर्ण देशात ‘को-ऑपरेशन अमंग को-ऑपरेटिव्ह’ म्हणजेच सहकारी संस्थांमध्ये परस्पर सहकार्याचा मंत्र जपला जाईल. ‘एकछत्री संघटना’ डिजिटल बँकिंग, मोबाईल बँकिंग, ऑनलाईन व्यवहार आणि परदेशांशी व्यापार यासारख्या उपक्रमांनी नागरी सहकारी बँकेसोबत एकत्रित करण्याचे काम करेल. देशातील सर्व राज्यांमध्ये सहकारांमध्ये सहकार्याचे तत्त्व लागू करून आपण मोठे यश मिळवू आणि तेव्हाच सहकार क्षेत्र आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होईल.
भारतामध्ये प्राचीन काळापासून सहकाराचा एक समृद्ध इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात सहकाराच्या माध्यमातून समूह विकासाची उद्दिष्ट्ये साध्य करणारी अनेक यशस्वी उदाहरणे आहेत. आपला देश व महाराष्ट्र राज्य याच वाटेवरून निरंतर प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. देशात सहकाराची एक शतकोत्तर अशी प्रगल्भ परंपरा आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड देखील याच वैचारिक परंपरेची पाईक असलेली वित्तीय संस्था आहे.