Premium|cooperative housing society maintenance fund : गृहनिर्माण संस्थेच्या समस्या आणि म्युच्युअल फंड

housing society management : सहकारी गृहनिर्माण संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी नियमित मेंटेनन्स, रिझर्व्ह फंड, आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक अत्यावश्यक आहे.
cooperative housing society maintenance fund

cooperative housing society maintenance fund

esakal

Updated on

सुहास दंडे-suhasdande@gmail.com

एखाद्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत (हाउसिंग सोसायटी) फ्लॅट विकत घेताना प्रत्येकाला नेहमी वाटत असते, की आपल्या सोसायटीचा परिसर स्वच्छ सुंदर असावा, बागबगीचा कायम सुस्थितीत असावा, इमारतीची नियमित रंगरंगोटी केली जावी, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षारक्षक असावेत, नामांकित कंपनीची लिफ्ट असावी; तसेच आपण विकत घेत असलेला फ्लॅट भविष्यात विकण्याची वेळ आली, तर त्याला चांगली किंमत मिळावी. मात्र, अशा गृहनिर्माण संस्था खूप कमी प्रमाणात दिसतात. याला कारण असते त्या संस्थेची आर्थिक स्थिती. गृहनिर्माण संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम ठेवण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे असते.

गृहनिर्माण संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असेल, तर तिची देखभाल उत्तमप्रकारे करणे शक्य होते. यासाठी संस्थेने योग्यप्रकारे आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व सदस्यांकडून नियमित देखभालशुल्क (मेटेंनन्स) जमा करणे, ठराविक एकरकमी रक्कम ‘रिझर्व्ह फंड’ म्हणून घेणे आवश्‍यक आहे. ही रक्कम योग्य म्युच्युअल फंडांसारख्या चांगला परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणे आव‍श्‍यक आहे. त्याचप्रमाणे सदस्यांनीदेखील नियमितपणे मेंटेनन्स, अन्य निधी वेळेत देणे गरजेचे आहे. आपण फ्लॅट खरेदी करताना सरकारचे अनेक प्रकारचे कर, मुद्रांक शुल्क, टीडीएस अशा सर्व प्रकारच्या रकमा निमूटपणे देत असतो. त्याचप्रकारे अशी काही ठराविक रक्कम देण्यास हरकत नसावी. यासाठी बांधकाम विकसकानेच सुरुवातीला एखादी मोठी रक्कम म्हणजे घराच्या किमतीच्या कमीत कमी दोन टक्के इतकी रक्कम संस्थेचा ‘रिझर्व्ह फंड’ म्हणून प्रत्येक सभासदांकडून गोळा करून सोसायटीकडे जमा केली तर सोसायटीच्या आर्थिक वाटचालीची सुरुवात चांगल्या रीतीने होऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com