Premium|Food Adulteration : भारतात अन्नात मोठ्या प्रमाणावर भेसळ होतेय का? आपचे राघव चड्ढा यांनी राज्यसभेत कोणती माहिती दिली..?

Package food in India : भाज्यांमध्ये ऑक्सिटोसिन, पनीरमध्ये स्टार्च आणि कॉस्टिक सोडा,मसाल्यांमध्ये विटांची पूड.. खरंच अन्नपदार्थांमध्ये अशी भेसळ होते का..?
Food alteration

Food alteration

Esakal

Updated on

पुणे - भारतात आपण असं अन्न खातो जे कित्येक देशात जनावरांना सुद्धा दिलं जात नाही.. असं म्हणत राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी नुकतीच भारतातील अन्नामधील भेसळीबाबत चिंता व्यक्त केली. भारतात अनेक कंपन्यांच्या माध्यमातून पॅकेट फूड विकले जाते ज्यामध्ये अत्यंत घातक रसायनं असतात. ज्यामुळे कॅन्सर, डायबेटीस, हार्ट फेल्युअर यांसारखे गंभीर आजार होत असल्याचं संशोधन सांगतं आहे.

जागतिक कंपन्यांसाठी भारताची लोकसंख्या एक मोठी बाजारपेठ आहे जिथे ते त्यांची उत्पादने ते विकू शकतात. मात्र ही उत्पादने विकत असताना त्यात होणारी भेसळ, खोट्या जाहिराती, पॅकेट फूडवर दिली जाणारी चुकीची माहिती या सगळ्याबाबत राघव चड्ढा यांनी आवाज उठवत यावर ठोस उपाय करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

राघव चड्ढा यांनी कोणत्या अन्नात भेसळ होत असल्याचे सांगितले, या भेसळीचे माणसांच्या आरोग्यावर कोणते परिणाम होतात, यामुळे कोणते गंभीर आजार होतात, असे कोणते पदार्थ आहेत जे जगाभरातील बहुतांश देशात बॅन असूनही भारतात सर्रास विकले जात आहेत, संशोधनाचे आकडे काय सांगतात आणि यावर काय उपाय आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com