Premium| Indian Weapon Accessories: तलवारीपासून तारफणीपर्यंत हरवलेली शस्त्रसंस्कृती

Historical Warfare Tools: पारंपरिक भारतीय शस्त्रांची वापर व्यवस्था पूर्ण करणारी ‘शस्त्रसखे’ ही उपकरणं युद्धकलेचा अदृश्य भाग होती. आज या शस्त्रपूरक वस्तू विस्मरणात गेल्या असून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सांगणं गरजेचं आहे.
Indian Weapon Accessories
Indian Weapon Accessoriesesakal
Updated on

गिरिजा दुधाट

dayadconsultancies@gmail.com

पूर्वी शस्त्रं वापरली कशी जायची बरं? युद्धभूमीवर नाही, इतर ठिकाणी कशी वापरली जायची? योद्धा असला, राजा असला, तरी सदासर्वदा हातात शस्त्र घेऊन तर फिरणार नाही. वेळप्रसंगानुसार शस्त्र कमरेला, पाठीवर लावावी लागणार, वापरात नसताना नीट ठेवावी लागणार, एकीकडून दुसरीकडे न्यावी लागणार, अगदी वापरतानासुद्धा सहजपणे वापरता यावीत, त्यांचं ओझं-अडचण होऊ नये याची व्यवस्था करावी लागणार.

थोडक्यात काय, युद्धातल्या वापरापलीकडे शस्त्रांना नीटपणे सांभाळावं लागायचं. ते सुसह्य व्हावेत यासाठी शस्त्रांबरोबर काही साहाय्यक उपकरणं वापरली जायची. यांचं अस्तित्व वरकरणी नगण्य वाटलं, तरी त्यांच्याशिवाय शस्त्रांचा वापर करणं जिकिरीचं व्हायचं. शस्त्रांचा अभ्यास करताना अनेकदा या वस्तू, उपकरणांचं अस्तित्त्व विसरलं जातं आणि परिणामी पारंपरिक शस्त्रव्यवस्थेचं एक अपूर्ण चित्र तयार होते. शस्त्रांचा वापर ‘पूरक’ करणं हे या शस्त्रसख्यांचं काम असायचं. कोण कोण असायचे हे शस्त्रसखे?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com