

Indian politics
esakal
कार्यकर्ता म्हणजे एखादी संघटना, चळवळ, पक्ष, संस्था किंवा सामाजिक उद्दिष्टासाठी सक्रियपणे काम करणारी व्यक्ती. थोडक्यात अर्थ जाणून घ्यायचा झाल्यास जी व्यक्ती विचारांवर विश्वास ठेवून, निःस्वार्थपणे आणि सातत्याने प्रत्यक्ष काम करते, तो कार्यकर्ता; पण हे आताचे राजकीय कार्यकर्ते म्हणजे डोळ्यांवर पट्ट्या बांधलेले आणि मेंदूला अर्धांगवायू झालेल्या मातीच्या पुतळ्यांसारखे खोटे वाटतात. हे सगळे डोळे मिटून दूध पिणारे बोके आहेत. ते काय करतात हे कुणालाच कळत नाही, असे त्यांना वाटते; पण तुम्ही जरी स्वतःला कार्यकर्ता म्हणवत असलात तरी तुमच्या नेत्यांना तुमच्यात कामगार दिसतो. कारण राजकीय पक्षांना कार्यकर्ता नकोच असतो. त्यांना हवा असतो त्यांनी लावलेली आग पसरविणारा एक प्रवाह... ते ठरवतील त्या दिशेने पेरणी करीत सुटेल, असा डोके नसलेला कामगार.