मुंबई: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे पुन्हा एकदा नियोजन केले आहे.
एकीकडे अमेरिकेच्या निवडणुका होण्यापूर्वी याच अमेरिकेने हिंडेनबर्ग अहवालाचे दाखले देत गौतम अदानी यांच्याविरोधात गुन्हेगारी आरोप केले होते. मात्र अमेरिकेतील निवडणुकांनंतर हे चित्र बदलू लागले आहे.
भारतात विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सात्तत्याने करत असलेल्या आरोपामुळे गौतम अदानी कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. मात्र अमेरिकेतील गुंतवणुकीचा, गौतम अदानी यांच्यावर झालेल्या आरोपांचा, अमेरिकेच्या निवडणुकांचा एकमेकांशी काय संबंध?
अदानी भारत सोडून अमेरिकेत गुंतवणूक का करत आहेत? त्यांच्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेत किती नोकऱ्या निर्माण होणार आहेत? ते कोणत्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याच्या विचारात आहेत आणि त्याचे राजकीय आणि आर्थिक अर्थ काय असू शकतात जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या माध्यमातून..