
ऐश्वर्य पाटेकर
गणपतला कोण आनंद झाला की आपण जागे आहोत! अन् अस्मानीचा निळा घोडा असा आपल्यासमोर येऊन उभा राहिला! नाहीतरी स्वप्नातच घोड्याला तो एकदा म्हणाला होता, की स्वप्नात खूप झालं, एकदा जागेपणी येऊन दाखव. घोड्यानंही तसं वचनही दिलं होतं की एकदा तरी येईन मी जागेपणी.
“..अस्मानीचा निळा घोडा
जंतर मंतर जादू तंतर
माग गणपत माग गणपत
नाहीतर नुसत्याच बिड्या
ओढत राहशील नंतर...”