
डेटिंग अॅप्स म्हणजे रिलेशनशिप मिळण्याचा झटपट गुलाबी मार्ग असला तरी समलिंगी पुरुषांसाठी हा गुलाबी सापळा जीवघेणा ठरतोय. डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून बोलावून फसवणूक, अत्याचार होण्याचं प्रमाण गे पुरुषांमध्ये खूप जास्त दिसत आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा भस्मासूर केवळ एवढ्यावरच शांत होत नाही तर वारंवार बोलावून बलात्कार, त्याचं शूटिंग करून ब्लॅकमेलिंग, पैसे उकळणं अशी गुन्ह्यांची मालिका चालूच राहते.
डेटिंग अॅप्सच्या गुलाबी विश्वाआडचे हे काटे आणि ते टोचणाऱ्या समलिंगी जगाची दखल घेतली आहे, सकाळ प्लसच्या माध्यमातून.
वाचा हा Firsrt Hand Report
कितीही पुढारलेला समाज म्हणवून घेतलं तरी आजही आपल्याकडे पुरुषांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांची टर उडवली जाते. डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून समलिंगी आणि गे व्यक्तींवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढतायत. आम्ही अशाच काही पीडितांशी आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांशी संवाद साधला.