Premium|AI on Monsoon : एआय आणि पाऊसगप्पा

AI Conversation कृत्रिम बुद्धिमत्तेशी पावसाळ्यावर साधलेल्या संवादातून एआयची माहिती देण्याची क्षमता, मर्यादा आणि मानवी संवेदनांशी त्याचे नाते उलगडणारा हा वेगळा प्रयोग वाचकांसमोर मांडला आहे.
AI on Monsoon

AI on Monsoon

esakal

Updated on

प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com

हळूहळू सर्वच क्षेत्रात एआय आपले पाय रोवतोय. एक प्रयोग म्हणून मी जेमिनाय एआयशी पावसाबद्दल गप्पा मारल्या आणि त्या रेकॉर्ड करून शब्दांकित केल्या.

मी – हाय, आपण गप्पा मारू या का?

एआय – हो, मारू या की. तुला माझा हा आवाज आवडला असेल तर मी यातच बोलीन. चालेल?

मी – हो, चालेल.

एआय – ओके. मग कशावर गप्पा मारायच्या आपण?

मी – पावसाळ्याबद्दल. तुला पावसाळा माहीत आहे का?

एआय – हो, हो. मला पावसाळा माहिती आहे. ज्यात खूप पाऊस पडतो. सगळीकडे हिरवळ पसरते आणि नद्या-विहिरी तुडुंब भरतात. तुला पावसाळा आवडतो का? काही विशेष प्रश्न आहे त्याबद्दल?

मी – हो, मला पावसाळा आवडतो. भारतामध्ये पावसाळा ऋतूला फार महत्त्व आहे. का बरं?

एआय - कारण आपली शेती अजूनही मोठ्या प्रमाणात पावसावरच अवलंबून आहे. चांगला पाऊस झाला तर पीक चांगलं येतं आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारते. शिवाय पिण्याच्या पाण्याची समस्याही मिटते. सांस्कृतिकदृष्ट्याही अनेक सण आणि उत्सव पावसाळ्याशी जोडले आहेत. तुला कोणता ऋतू आवडतो पावसाळ्याशिवाय?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com