Premium|Gen Z Financial Mindset : कॉन्सर्ट, कॉफी अन् एसआयपी; जेन झी पिढी पैशांकडे नव्या नजरेने का पाहतेय?

Gen Z Financial Mindset : कॉन्सर्ट, कॉफी आणि डिजिटल खर्चासोबत एसआयपी, ईएमआय आणि निवृत्ती नियोजन करणारी जेन झी पिढी आजचा आनंद आणि भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्य यांचा समतोल साधत आहे.
Gen Z Financial Mindset

Gen Z Financial Mindset

esakal

Updated on: 

सई डिग्रजकर - sai_a8@rediffmail.com

कॉन्सर्ट, कॉफी आणि क्विक-कॉमर्सपासून एसआयपी, ईएमआय आणि निवृत्तीपर्यंत ‘जेन झी’ पैशाकडे नव्या नजरेने पाहात आहे. आयुष्य मनापासून जगायचं आणि उद्याची आर्थिक मोकळीकही टिकवायची, या दोन टोकांच्या गोष्टींचा मेळ घालणं हे या पिढीसमोरचं एक महत्त्वाचं आर्थिक आव्हान आहे. त्याचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या या पिढीचा पैशाकडे पाहण्याचा आणि जगण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. या पिढीच्या आर्थिक विचारसरणीचा घेतलेला हा वेध...

कॉफी शॉपमध्ये हातात ट्रेंडी टंबलर धरून बसलेला किंवा कोल्डप्लेच्या कॉन्सर्टसाठी महिन्याभराचा पगार खर्च करायला तयार असलेला एखादा तरुण तुम्हाला आळशी किंवा उधळ्या वाटू शकतो़, पण त्याच तरुणाच्या मोबाईलमध्ये म्युच्युअल फंडाच्या ‘एसआयपी’चं ॲप सुरू असतं आणि तो निवृत्तीच्या गणितावर गंभीर चर्चा करत असतो...थोडक्यात सांगायचं तर, ‘जेन झी’च्या पैशाचं गणित वरवर पाहता विरोधाभासी वाटतं. विशेषतः शहरी आणि डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडलेल्या ‘जेन झी’मध्ये हा बदल अधिक स्पष्टपणे दिसतो. स्मार्टफोन, यूपीआय, डिजिटल पेमेंट, सहज उपलब्ध क्रेडिटची भूमिका यात नक्कीच आहे; पण यामागे केवळ तंत्रज्ञान नाही, तर या पिढीचा पैशाकडे पाहण्याचा आणि जगण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. आजचा तरुण उपलब्ध पर्यायांचा वापर कसा करतो आणि आज घेतलेला निर्णय उद्याचे कोणते मार्ग बंद करतो किंवा खुले ठेवतो, हा खरा कळीचा मुद्दा आहे.

Loading content, please wait...