Premium|Gen Z Women : जेन झी मुलींची पैशाकडे पाहण्याची दृष्टी बदलतेय; आर्थिक स्वावलंबनाचा नवा प्रवास

Gen Z Women Financial Independence : जेन झी पिढीतील मुलींचा आर्थिक व्यवहारांमधील वाढता सहभाग, कमाईबाबतचे निर्णय आणि पैशाकडे पाहण्याची बदलती दृष्टी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवे परिमाण देत आहे.
Gen Z Women Financial Independence

Gen Z Women Financial Independence

esakal

Updated on: 

डॉ. प्रज्वल वडेट्टीवार- prajwal.wadettiwar@sse.ac.in

साधारणपणे ‘जेन झी’ पिढी आज शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्वावलंबनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे. या पिढीबद्दल बोलताना जीवनशैली, सोशल मीडिया किंवा खर्चाच्या सवयी यांची चर्चा पटकन होते; पण त्यापलीकडे एक अधिक रंजक बदल घडतो आहे. या पिढीसाठी पैशाचा अर्थच हळूहळू बदलतो आहे. विशेषतः या पिढीतील मुलींचा आर्थिक व्यवहारांतील सहभाग, पैशाकडे बघण्याची दृष्टी अर्थव्यवस्थेला नवी ताकद देणारी वाटते.

माझ्या बहिणीच्या मुलीला तिच्या मैत्रिणींशी बोलताना ऐकलं, ‘‘ओके गर्ल, वी एट इट!’’ मुद्दा डान्सच्या स्पर्धेत जिंकलेल्या ट्रॉफीचा होता; पण संवाद, शब्द आणि आत्मविश्वास पाहता जणू एखादी उच्चस्तरीय बिझनेस मीटिंगच सुरू आहे, असं वाटत होतं. साधारणपणे १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली ‘जेन झी’ पिढी आज शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्वावलंबनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे. या पिढीबद्दल बोलताना जीवनशैली, सोशल मीडिया किंवा खर्चाच्या सवयी यांची चर्चा पटकन होते; पण त्यापलीकडे एक अधिक रंजक बदल घडतो आहे. या पिढीसाठी पैशाचा अर्थच हळूहळू बदलतो आहे. विशेषतः या पिढीतील मुलींचा आर्थिक व्यवहारांतील सहभाग, पैशाकडे बघण्याची दृष्टी अर्थव्यवस्थेला नवी ताकद देणारी वाटते. भारताच्या अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढतो आहे. एका अभ्यास अहवालानुसार, १५ वर्षे आणि त्यावरील महिलांचा श्रमशक्ती सहभाग दर २०१७ मधील २३.३ टक्क्यांवरून २०२५ मध्ये ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला. अर्थात, श्रमशक्तीमध्ये येणं म्हणजे पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य नव्हे. कमाई करणं ही सुरुवात आहे. त्या कमाईवर निर्णय घेता येणं, ती जपता येणं आणि तिच्यातून पुढचे पर्याय निर्माण करता येणं, हा त्याचा पुढचा भाग आहे. आणि याच ठिकाणी ‘जेन झी’ मुलींची गोष्ट अधिक रंजक होते.

Loading content, please wait...