
अनय सांगतो, त्याला जॉब सॅटिसफक्शन हवंय. बॉसने नीट बोलायला हवं, कामाचं प्रेशर नको, आणि राजकारण नको. किमया म्हणते विश्रांती हवी, कामाची कटकट नसली पाहिजे. उमंग म्हणतो, काम आणि आयुष्य वेगळं ठेवता आलं पाहिजे. कामाचं ओझं होता कामा नये. या सगळ्या मागण्या आहेत Gen Zs च्या!
झूमर्स, म्हणजेच Generation Zee, म्हणजेच ‘Gen Z’ लोकं. ज्यांचा जन्म 1997 पासून 2012 या काळात झालाय, ते Gen Z मध्ये मोडतात. या लोकांवर अगदी लहानपणापासून इंटरनेटचा प्रभाव आहे. यांच्या आधीच्या पिढीपर्यंत इंटरनेट, सोशल मीडिया वगैरे नव्याने शिकवं लागत होतं. पण या पिढीसाठी हे काही नवीन नाही. सोशल मीडियामुळे जगभरात जे चाललंय ते यांना एका click वर कळतं!
या पिढीला हे खूप आधीपासून अनुभवायला मिळालेलं आहे. त्यात ही पिढी आता नोकऱ्या, व्यवसायात रुजू झालेली आहे. पण पुर्वीसारखं या पिढीला फक्त ‘पैसे’च हवेत असं नाहीये बरंका. यांच्या कामाकडून, कामाच्या ठिकाणाकडून आधीच्या पिढीपेक्षा वेगळ्या अपेक्षा आहेत. त्या कोणत्या? Gen Z ला नेमकं काय हवंय त्यांच्या कामातून? त्यांची ‘ideal job’ ची संकल्पना काय? ते कामाबद्दल काय बरं म्हणतायत? हे सगळं वाचा ‘सकाळ प्लस’च्या या लेखात...