Premium|Gender equality discourse: जेंडर इक्वालिटीचे चर्चाविश्व

Reframing Gender Equality: लैंगिक समानता केवळ कौटुंबिक वा कार्यालयीन मर्यादेत नाही, तिच्या संस्थात्मक पुनर्रचनेवरही विचार होणे गरजेचे आहे.
Patriarchy and gender bias
Patriarchy and gender biasesakal
Updated on

भगवान फाळके

phalkeb2020@gmail.com

जेंडर इक्वालिटीविषयी चाललेल्या चर्चांमध्ये प्रकर्षाने मध्यमवर्गीय दृष्टिकोन दिसून येतो. त्यावर काम करणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षकांनी त्याबाबतची चर्चा मध्यमवर्गीय चौकटीत आणलेली आहे. परिणामी त्यापलीकडे असणाऱ्या जेंडर इक्वालिटीचा व्यापक संदर्भ बाजूला झाला. ती केवळ कौटुंबिक वा कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी अस्तित्वात आणण्यापुरती मर्यादित नसून त्याच्या संस्थात्मक पैलूंची चिकित्सा करणे तसेच त्याच्या पुनर्रचनेबाबत स्त्रीवाद्यांनी विकसित केलेले चर्चाविश्व समजून घेणे आवश्यक आहे.

आजघडीला ‘जेंडर’ ही संकल्पना अगदी सहजपणे वापरण्यात येते. मात्र, तिला सहजासहजी अधिमान्यता मिळालेली नाही. बौद्धिक जगतातील पितृसत्ताक वर्चस्वखोरपणाचा तिला सामना करावा लागला आहे. जेंडर संकल्पनेला बौद्धिक जगात मध्यवर्तीत आणण्यात स्त्रियांच्या चळवळी, स्त्रीवादी चर्चाविश्व आणि स्त्री अभ्यास यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. क्रांतिकारक स्वरूपाच्या या संकल्पनेने स्त्रीमुक्तीच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या विश्लेषणाला तर्कसंगतता दिली. ज्यामुळे पितृसत्ताक विचारप्रणालीचा समर्थ प्रतिवाद अधिक शक्य झाला. शिवाय स्त्रीमुक्तीसाठीच्या प्रबोधनाला ऊर्जा दिली गेली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com