
युगांक गोयल प्राध्यापक, ‘फ्लेम’ विद्यापीठ संचालक, ‘सेंटर फॉर नॉलेज अल्टरनेटिव्ह’
कृती भार्गव विद्यार्थिनी
वेळ हा सर्वांना समान प्रमाणात मिळणारा स्रोत आहे. पण त्याचा वापराबाबत सर्वांत मोठी असमानता दिसते. वेळेचा वापर कसा केला जातो यावरून संबंधित समाज किती गतिमान आहे अन् त्याची लिंग समानतेची, आर्थिक स्थिती कशी आहे, हे समजते. भारत सरकारच्या सांख्यिकी आणि उपक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे (एनएसओ) आयोजित वेळ विनियोग सर्वेक्षणात (टीयूएस) याचाच अभ्यास करण्यात आला. महाराष्ट्रासंदर्भात याचा अन्वयार्थ काय लावायचा, त्याविषयी...