Premium|AI and Creativity : मशीन खरंच कलाकार होऊ शकतं का? व्हॅन गॉग आणि पिकासोच्या शैलीत चित्रे काढणाऱ्या 'एआय'ची नेमकी जादू काय?

Artificial Intelligence : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी सर्जनशीलता यातील संघर्षाचे सखोल विश्लेषण; चित्रकला, संगीत, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात 'एआय'ने केलेली प्रचंड उलथापालथ, तांत्रिक प्रगती आणि भविष्यातील रोजगारासमोर उभे ठाकलेले कठीण आव्हान यावर टाकलेला हा एक महत्त्वपूर्ण प्रकाशझोत.
Artificial Intelligence

Artificial Intelligence

esakal

Updated on

अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर

‘एआय’ प्रचंड डेटा वापरून त्यातले पॅटर्न्स शोधून कुठलीही गोष्ट किंवा कलाकृती करत असतो. त्यामुळे त्याला क्रिएटिव्ह नक्कीच म्हणता येणार नाही; पण त्याच्या साहाय्यानं निर्माण झालेलं संगीत, चित्रकला, कथा, स्क्रिप्ट, सिनेमा किंवा जाहिरात हे जर का अतिशय श्रवणीय, देखणं किंवा सुंदर दिसत किंवा वाटत असेल तर ते कोणी निर्माण केलं आहे, त्यात क्रिएटिव्हिटी आहे की नाही, असल्या फंदात न पडता त्याचा आनंद घेणं हे जास्त महत्त्वाचं नाही का, हा प्रश्न आहेच.

‘एआय’मुळे कलाविश्वामध्ये प्रचंड उलथापालथ होणार आहे आणि आताही आपल्याला ती बघायला मिळतेच आहे. १९५०-६०च्या दशकामध्ये गणिताच्या साहाय्यानं प्रोग्रामद्वारे वेगवेगळे भौमितिक आकार प्लॉटर्सवर काढून त्याची चित्र बनवणं सुरू होतं. ती अर्थातच कला या प्रकारात बसत नव्हतीच. १९७३मध्ये हॅरोल्ड कोहेन यानं ‘अँरॉन’ नावाचा एक कॉम्प्युटर प्रोग्रॅम बनवला. तो दिलेल्या प्रोग्रॅमप्रमाणे फक्त भौमितिकच नव्हे तर वेगवेगळ्या तऱ्हेची चित्रंही वेगवेगळ्या रंगात काढत असे; पण तरीही ही चित्रं दिलेल्या प्रोग्रॅमप्रमाणे काम करत असत. त्याच्या बाहेर ती काहीही करू शकत नसत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com