
डॉ. राजेश खरात
जर्मनीतील सरकारने स्थलांतरितांचे लांगूलचालन केले आणि ते सत्तेवर राहिले, असा प्रचार उजव्या आणि अतिउजव्या विचारांच्या पक्षांनी केला. या पक्षांनी प्रचारात उघडपणे रशियाला पाठिंबा दर्शविला. अशी वेगळी भूमिका घेणाऱ्या या पक्षांना निवडणुकीत यश मिळाल्याने जर्मनीतीलच नव्हे तर युरोपातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.