Premium|Global conflicts 2025 : २०२६ युद्ध की शांतता? जगाचे भविष्य राजकीय इच्छाशक्तीच्या हाती

World war peace politics : २०२५ मध्ये जगभर युद्धे सुरू असतानाही शांततेसाठी प्रयत्न झाले. रशिया-युक्रेन, गाझा, आफ्रिका, आशिया संघर्ष कायम राहिले. २०२६ हे वर्ष युद्ध की शांततेचे ठरेल, हे जागतिक राजकीय इच्छाशक्ती, लष्करीकरण कमी करून मानवी सुरक्षा व विकासाला प्राधान्य देण्यावर अवलंबून आहे.
Global conflicts 2025

esakal

Updated on

डॉ. अमिताभ सिंग- samitabh@gmail.com

जगभरात सुरू असलेल्या युद्धांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे महत्त्वपूर्ण प्रयत्न २०२५ मध्ये झाले. युद्ध हा राजकीय निर्णय असतो आणि शांतताही तितकीच महत्त्वाची असते. २०२६ वर्ष युद्धाचे असेल की शांततेचे, हे राजकीय इच्छाशक्तीवरच अवलंबून आहे.

नवे वर्ष उजाडले ते व्हेनेझुएलातील अमेरिकी ऑपरेशनमुळे. अमेरिकेने पहाटेच्या सुमारास राजधानी काराकासमध्ये हल्लाबोल करून व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना थेट अटक करून अमेरिकेत आणले. सार्वभौम राष्ट्राच्या प्रमुखाला थेट उचलून आणण्याची ही जगातील दुसरी घटना आहे. अगोदरच आर्थिक संकट आणि हुकूमशाहीच्या दिशेने चाललेल्या व्हेनेझुएलामध्ये आता अंतर्गत उलथापालथी होऊन देशाची वाटचाल इराक, लिबियाच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इस्राईलसोबतच्या सात दिवसांचे युद्ध आणि अमेरिकेच्या हल्ल्यामुळे कमकुवत झालेल्या इराणमध्ये अंतर्गत उठाव तीव्र झाला आहे. इस्लामिक राजवटीविरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामध्ये अमेरिका केव्हाही लष्करी हस्तक्षेप करू शकते. डेन्मार्कचा भाग असलेल्या ग्रीनलँडला ताब्यात घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या हालचाली वाढवल्या आहेत.... अशा सर्व घडामोडींमुळे यंदाचे नवे वर्ष अनेक समस्या घेऊन येणार असल्याचा इशारा एक प्रकारे जगाला देत आहे.

जगातील काही अत्यंत संहारक युद्धे नव्याने आलेल्या २०२६ वर्षातही कोणताही तोडगा न निघता सुरूच राहणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी २०२५ मध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे काही महत्त्वपूर्ण प्रयत्न झाले. त्यामुळे जागतिक युद्धजन्य परिस्थिती केवळ निराशाजनकच राहिली, असे म्हणता येणार नाही. दीर्घकाळ चालत आलेला भीषण संघर्ष आणि वर्षभरातील नाजूक राजनैतिक प्रगतीमधील विरोधाभास एक साधे सत्य अधोरेखित करतो. ते म्हणजे, युद्ध हा राजकीय निर्णय असतो आणि शांतताही तितकीच राजकीय निवड असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com