
डॉ. सुमित म्हसकर
mhaskar.sumeet@gmail.com
परदेशातील दलित, आंबेडकरी समाजाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवसाचे एका जागतिक उत्सवात रूपांतर केले आहे. पाश्चात्त्य देशांमधील लोकप्रतिनिधी, अधिकारी आता बाबासाहेबांच्या जयंतीला अर्थात १४ एप्रिल रोजी त्यांचे स्मरण करतात. बाबासाहेबांचे जातीव्यवस्था नष्ट करण्याचे तत्त्वज्ञान आता सर्वत्र प्रतिध्वनित होते. त्यामुळे ते सामाजिक न्यायाचे जागतिक प्रतीक बनले आहेत.
२१व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समता व सामाजिक न्यायाच्या लढ्याचे जागतिक प्रतीक म्हणून पुढे आले. भारतात आणि त्याहीपलीकडे दूरवरच्या खेड्यांपासून ते गजबजलेल्या शहरांपर्यंत दलित तसेच आंबेडकरवादी १४ एप्रिल हा दिवस अतूट समर्पणाने साजरा करतात... आंबेडकरांच्या समतावादी समाजाच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देतात.