
संतोष शिंत्रे
जगभरातील पर्यावरणासाठी मागचे वर्ष अत्यंत खराब म्हणावे लागेल. प्रत्येक खंडात हे दुष्परिणाम जाणवले. जगभरातील चालू संघर्ष/युद्धे यांची व्याप्ती आणि तीव्रता वाढतच गेली. हवामान होरपळीमुळे उद्धभवलेली नैसर्गिक अरिष्टे अनेक समूहांचे जिणे मुश्किल करून गेली; अवर्षणे, दुष्काळ ह्यात वाढ झाली;आणि आर्थिक समस्या आणखी गडद होत गेल्या.अनेक देशांमध्ये ट्रम्पसदृश लोकानुनयी, पर्यावरणविरोधी नेते निवडले गेले.