Premium|Global Investing for Indian Investors : परदेशी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची भारतीयांसाठी योग्य वेळ आहे का?

Global Investing for Indian Investors : भारतीय शेअर बाजारातील परताव्याची आव्हाने आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे परदेशी बाजारपेठांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वाढत आहे. म्युच्युअल फंड आणि ईटीएफद्वारे जागतिक गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
Global Investing for Indian Investors

Global Investing for Indian Investors

esakal

Updated on: 

विशाखा बाग - gauribag7@gmail.com

शेअर बाजारातील थेट गुंतवणूक असो किंवा म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांमधील गुंतवणूक, परताव्याच्या बाबतीत गेल्या काही काळात मोठे आव्हान राहिले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होत असलेले अवमूल्यन आणि अमेरिकी बाजारातील चांगली कामगिरी यामुळे डॉलर किंवा डॉलरशी संबंधित मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय गुंतवणूकदारांना तुलनेने चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे आता भारतीय गुंतवणूकदारांनी परदेशी बाजारपेठांकडे पाहण्याची वेळ आली आहे.

एकेकाळी जगातील विविध भांडवली बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता केवळ मोठे गुंतवणूकदार, उद्योगपती किंवा अतिश्रीमंत वर्गाकडेच असल्याची धारणा होती. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांत हे चित्र मोठ्या प्रमाणात बदलले आहे. म्युच्युअल फंड, ईटीएफ आणि विविध डिजिटल गुंतवणूक व्यासपीठांमुळे सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदारालाही अमेरिका, जपान, चीन, तैवान, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांच्या बाजारपेठांमध्ये अप्रत्यक्ष किंवा थेट गुंतवणूक करणे शक्य झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com