

Educational Culture and Quality
esakal
‘सीओईपी’ तंत्रज्ञान विद्यापीठातील नवनियुक्त ‘पीएम’ प्राध्यापक
भारताने क्रमवारीशिवाय जागतिक दर्जाच्या संस्था उभ्या केल्या. आज अनेक क्रमवारी असूनही दर्जाबाबतची अस्वस्थता पूर्णपणे कमी झालेली नाही. याचा अर्थ क्रमवारी चुकीची आहे असे नाही. परंतु ती अंतिम मापदंड नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मोजमाप हे साधन आहे; ते संस्कृतीची जागा घेऊ शकत नाही.
एकेकाळी भारतीय विद्यापीठांना स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी दरवर्षी जाहीर होणाऱ्या क्रमवारीची वाट पाहावी लागत नव्हती. कोण पहिल्या क्रमांकावर, कोण दहाव्या अशा चर्चा नव्हत्या. ‘गुणांकन’, ‘मान्यताप्रक्रिया’, ‘परफॉर्मन्स डॅशबोर्ड’ या संकल्पना अस्तित्वात नव्हत्या. तरी त्या काळातील विद्यापीठांनी जागतिक दर्जाचे विद्वान घडवले. विज्ञान, प्रशासन, न्यायव्यवस्था, उद्योग आणि सार्वजनिक जीवन या सर्व क्षेत्रांत भारतीय पदवीधरांनी आपला ठसा उमटवला. ही फक्त आठवण नाही. हे प्रत्यक्षात घडलेले वास्तव आहे.