
डॉ. वीरेंद्र ताटके
tatakevv@yahoo.com
आपल्या देशात सोन्याला सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळे सर्वसामान्य भारतीयांसाठी सोन्याचे आकर्षण फार पूर्वीपासून आहे. शिवाय, सोन्याचे भाव सातत्याने वाढतच चालले आहेत. सोन्यातील गुंतवणुकीवर दीर्घ काळात कधीही निगेटिव्ह रिटर्न मिळाले नाहीत, असे आकडेवारीवरून दिसून येतं. त्यामुळे ‘सुरक्षित गुंतवणूक’ हा लौकिक सोन्याने कायम राखला आहे; मात्र प्रत्यक्ष सोने खरेदी करण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सोने खरेदी करण्याचा पर्याय अधिक सोपा, सुटसुटीत, पारदर्शक, सुरक्षित आणि फायद्याचा आहे. गुंतवणुकीत यशस्वी होण्याच्या या सोनेरी राजमार्गाविषयी माहिती देणारा हा संवाद...