पुणे : तुमच्या आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेले गुगल आता भविष्यात मोठी झेप घेणार आहेत. गुगल कंपनीची महत्वाची मानली जाणारी वार्षिक Google I/O 2025 ही परिषद २० आणि २१ मे २०२५ रोजी माउंटेन व्ह्यू, कॅलिफोर्निया येथे आयोजित करण्यात आली होती. या वर्षी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हा या परिषदेचा केंद्रबिंदू होता. Google ने AI च्या क्षेत्रात केलेली प्रगती आणि भविष्यातील योजना यावेळी सादर करण्यात आल्या.
Google I/O ही Google ची वार्षिक डेव्हलपर परिषद आहे. जिथे कंपनी आपली नवनवी उत्पादनं, नवीन तंत्रज्ञान आणि भविष्यातील होऊ घातलेले बदल जगासमोर मांडते. 'I/O' म्हणजे 'इनोव्हेशन इन द ओपन' . दरवर्षी मे महिन्यात अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील माउंटेन व्ह्यू येथे ही परिषद आयोजित केली जाते.
या वर्षीच्या या परिषदेत नेमक्या कोणत्या घोषणा केल्या गेल्या, कोणत्या नवीन फीचर्सची माहिती दिली गेली, Google DeepMind चे CEO Demis Hassabis यांनी काय भाष्य केले, त्यांनी तरुणांना काय सल्ला दिला, भविष्यात तरुणांना कोणते स्किल्स आवश्यक असणार आहेत याविषयी सांगितले. हे सगळं जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या विशेष लेखातून..!