

Naxalism Elimination Mission
esakal
ई. झेड. खोब्रागडे- ez_khobragade@rediffmail.com
भारताच्या गृहमंत्र्यांनी नुकतीच घोषणा केली, की नक्षलवाद ३१ मार्च २०२६ पर्यंत संपवून टाकायचा... मला वाटते, ही केवळ घोषणा नाही; तर गृहमंत्र्यांचा निर्धार आहे, निर्णय आहे... या निर्णयाचे यश दिसू लागले आहे. मोठ्या संख्येने नक्षलवादी आत्मसमर्पण करू लागले आहेत. चकमकींत काहींचा खात्मा झाला. नक्षलवादी-माओवादी संघटनेच्या केंद्रीय समितीच्या नेत्यांमध्ये जाहीर मतभेद असल्याचे दिसू लागले. नक्षलवाद संपवण्याची ही प्रक्रिया वेग धरू लागली. पोलिस यंत्रणा सक्रिय होऊन, वेगवेगळे मार्ग वापरून गृहमंत्र्यांच्या निर्णयाला मूर्त रूप देण्यासाठी प्राण पणाला लावण्यात आले. काही शहीद झाले. मागील एक-दोन वर्षांत ज्या वेगाने नक्षलवाद्यांचा बीमोड करण्याच्या घटना घडल्या तेवढ्या यापूर्वी झाल्या नाहीत. गृह खात्याने योग्य पद्धतीने हे ऑपरेशन राबविले. सुरक्षा यंत्रणासुद्धा त्यासाठी अभिनंदनास पात्र आहेत.