
डॉ. रवींद्र उटगीकर
सरकारी योजना म्हणजे कोणत्या ना कोणत्या समाजघटकाला किमान कागदोपत्री तरी खूष करण्याचा प्रयत्न असे समीकरण अलीकडच्या काळात झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शेतीपंपांसाठी सौर ऊर्जेच्या योजना केंद्र व महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्या आहेत. त्या निमित्ताने.
नसे राऊळी वा नसे मंदिरी ।
जिथे राबती हात तेथे हरी ।।
महाकवी ग.दि. माडगुळकर यांचे हे प्रसिद्ध गीत. १९६०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उमज पडेल तर’ या चित्रपटात ते चित्रित झाले आहे. हरीचा वास असणारा आपल्या सर्वांचा पोशिंदा शेतकरी मात्र तेवढ्याच इमानेइतबारे शेतात राबतो आहे. त्याच्या हातांना बळ देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सरकारच्या काही योजनांची दखल घ्यायला हवी.