Premium|Himalyan Glacier System : हाम्टा हिमनदी; हिमालयातील दोन वेगळ्या जगांना जोडणारा बर्फाचा पूल

Himalayan Glacier and Geography : हिमाचल प्रदेशातील हाम्टा हिमनदी कुल्लूच्या हिरव्यागार खोऱ्याला स्पितीच्या कोरड्या प्रदेशाशी जोडते. या हिमनदीच्या परिसरातून हिमालयातील हवामान, भूगोल आणि निसर्गातील विविधता अनुभवता येते.
Himalyan Glacier System

Himalyan Glacier System

esakal

Updated on: 

उमेश झिरपे - umzirpe@gmail.com

हाम्टा हिमनदी आपल्याला हिमालयाचा एक वेगळा पैलू दाखवते, विविधतेचा. ती सांगते की हिमालय एकसारखा नाही, तर अनेक जगांचा संगम आहे. एका बाजूला पाणी, हिरवाई आणि जीवन; दुसऱ्या बाजूला कोरडेपणा, कठोरता आणि शांतता आणि या दोन टोकांना जोडणारा हा बर्फाचा पूल म्हणजे हाम्टा हिमनदी. ती लहान आहे, पण तिचं महत्त्व मोठं आहे. ती शांत आहे, पण तिच्या माध्यमातून दोन वेगवेगळ्या जगांचा संवाद घडतो. म्हणूनच हाम्टा हिमनदी ही केवळ एक हिमनदी नाही; ती हिमालयाच्या विविधतेचं जिवंत प्रतीक आहे.

हिमालयाकडे आपण अनेकदा एकसंध पर्वतरांग म्हणून पाहतो. पण प्रत्यक्षात हिमालय हा एकसारखा नाही; तो सतत बदलणारा, विविध रूपांनी भरलेला प्रदेश आहे. काही ठिकाणी हिरवीगार दरी, काही ठिकाणी कोरडा, वाळवंटी भूभाग, तर काही ठिकाणी बर्फाच्छादित शिखरं हे सगळं एका मर्यादित अंतरात बदलताना दिसतं. या बदलाचा सर्वात प्रभावी अनुभव घ्यायचा असेल, तर हिमाचल प्रदेशातील हाम्टा पास आणि त्याच्या परिसरातील हिमनदीकडे पाहावं लागतं.

हाम्टा हिमनदी ही एखाद्या एकाच विशाल बर्फपट्ट्यासारखी नाही. ती लहान, विखुरलेली पण अत्यंत महत्त्वाची हिमनदी प्रणाली आहे, जी कुल्लूच्या हिरव्या खोऱ्याला आणि स्पितीच्या कोरड्या, उंच प्रदेशाला जोडते. मनालीपासून सुरू होणारा हाम्टा पास ट्रेक हा हिमालयातील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण ट्रेकपैकी एक मानला जातो. सुरुवातीला दाट जंगलं, हिरवी कुरणं आणि पाण्याचे स्वच्छ प्रवाह दिसतात. हा भाग पर्जन्यमानाने समृद्ध आहे. पण जसजसं आपण वर चढत जातो, तसतसा भूभाग बदलू लागतो. हाम्टा पास ओलांडल्यानंतर अचानक दृश्य पूर्णपणे बदलतं, हिरवाई नाहीशी होते, खडकाळ, कोरडा आणि वाळवंटी प्रदेश सुरू होतो. हा बदल केवळ दृश्यात्मक नाही; तो हवामान, भूगोल आणि हिमनदी प्रणालीतील फरक दाखवतो.

Loading content, please wait...