
प्रमोद काळबांडे
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलढाण्याच्या हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली असून, ते सक्रियही झाले आहेत. हर्षवर्धन यांची नाळ सेवाग्रामशी घट्ट जुळली आहे. काँग्रेसची विचारसरणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नसांमध्ये भिनल्याचे मानले जाते. त्यांच्या निवडीनंतर काँग्रेसच्या संघटनात्मक बदलांना सुरवात होईल, असे मानले जाते.
हर्षवर्धन सपकाळ यांचा गेल्या शनिवारी बुलढाण्यात भव्य नागरी सत्कार झाला. फेटा बांधला, घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. शहरात ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला. नेत्यांची साधारणतः लाडूतुला केली जाते. सपकाळांची वहीतुला करण्यात आली. या वह्या गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.