Premium|Understanding Elephants and Coexistence : ‘हाथी को जानो’ पुस्तकातून हत्तींचे वर्तन आणि सहअस्तित्वाचा धडा

Bandhavgarh Elephant-Human Conflict : ‘हाथी को जानो’ या सचित्र पुस्तकातून हत्तींचे वर्तन, मानवांसोबत सुरक्षित सहअस्तित्व आणि बांधवगड परिसरातील हत्ती-मानव संघर्षाचा सविस्तर आढावा वाचकांसमोर मांडण्यात आला आहे.
Understanding Elephants and Coexistence

Understanding Elephants and Coexistence

esakal

Updated on

विनोद राऊत

वन्यजीव अभ्यासक केदार गोरे आणि दिव्या कलसी यांनी लिहिलेले ‘हाथी को जानो’ हे सचित्र पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. पर्यावरण कार्यकर्ते आणि सॅंक्च्युरी नेचर फाउंडेशनचे संस्थापक-संपादक बिट्टू सहगल यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. या पुस्तकाच्या निर्मितीत देशाच्या हत्ती प्रकल्पाचे प्रमुख रमेश पांडे, मध्य प्रदेशच्या प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक डॉ. समिता रजौरा तसेच दी कॉर्बेट फाउंडेशनच्या अध्यक्षा रिना खटाऊ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कॉर्बेट फाउंडेशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा मुख्य उद्देश हत्तींबद्दल व्यापक आणि शास्त्रीय माहिती देणे हा आहेच; मात्र त्याबरोबरच मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात आणि आसपास राहणाऱ्या तरुणांना व स्थानिक समुदायांना हत्तींचे वर्तन, त्यांच्यासोबत सुरक्षितपणे सहअस्तित्वाने राहण्याचे महत्त्व आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना समजावून देणे, हा या पुस्तकाचा महत्त्वाचा हेतू आहे. हत्तीला समजून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरते. पुस्तकात बांधवगड परिसरातील हत्ती-मानव संघर्षाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. गेल्या दशकात या संघर्षामुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. काही ठिकाणी हत्तींना मारण्याचे प्रयत्नही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बांधवगड परिसरातील हत्ती-मानव संघर्षाची केस स्टडी या पुस्तकात मांडण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com