Premium|Healthy Ageing : वृद्धत्व म्हणजे आजार नव्हे; ९० वर्षांच्या वारकरी आजीने शिकवले निरोगी आयुष्याचे गमक

Ageing Is Not a Disease : वृद्धत्व म्हणजे आजार नव्हे, तर निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि सक्रिय जीवन जगण्याची संधी आहे. योग्य जीवनशैली आणि सकारात्मक दृष्टिकोनातून निरोगी वृद्धत्व साध्य करता येते.
Healthy Ageing

Healthy Ageing

esakal

Updated on

डॉ. दिलीप निकम - sakal.avtaran@gmail.com

धकाधकीच्या जीवनात मन-शरीर सुदृढ ठेवण्याची गरज आहे. योग्य जीवनशैली स्वीकारल्यास आजारांचा धोका कमी करता येतो. मात्र, त्यासाठी स्वतःला आनंदी ठेवण्याची गरज आहे आणि ती कला उलगडून दाखवणार आहेत प्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ आणि बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप निकम, आजपासून आपल्या पाक्षिक सदरातून...

मित्राचा ‘इंस्टा’वरील पंढरपूर वारीतील अनुभव त्याच्याच शब्दांत सांगायचा तर, त्या व्हिडिओमध्ये हजारो वारकऱ्यांच्या गर्दीत ९० वर्षांची एक आजी दिसते... अंगावर भगवी साडी, एका हातात काठी, पाठीवर छोटीशी पिशवी, गळ्यात रुद्राक्षांची माळ, डोळ्यांवर तुटलेला चष्मा, पाठ थोडी वाकलेली... पण डोक्यावर भक्तीची तुळस मात्र ताठ उभी. मुखात ‘राम कृष्ण हरी... राम कृष्ण हरी...’चा गजर करत ती विठुरायाच्या दर्शनासाठी दिंडीतून चालत होती. तिची अनवाणी पावलेही जणू भक्तीच्या ऊर्जेने भारलेली होती. आजीबाईच्या चेहऱ्यावर सुरकुत्या सोडल्या; तर वृद्धत्वाचा कुठलाही पुरावा नाही. वय ९० तिने सांगितले म्हणून खरे मानायचे; पण तिचा उत्साह कुठल्याही विशीतल्या तरुणीला लाजवेल असाच! म्हणूनच त्या आजीत मला वृद्धत्व म्हणजे आजार नव्हे; तर निरोगी आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन सांगणारी विठू माऊली दिसली!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com