Premium|Hema Malini Career : हवा के साथ साथ...

Hema Malini 60 Years : साठ वर्षांच्या चित्रपट प्रवासात अभिनेत्री, नृत्यांगना, दिग्दर्शिका आणि खासदार म्हणून बहुआयामी ठसा उमटवत 'ड्रीमगर्ल'ने व्यावसायिक यशासह कलात्मक अभिनयाचीही वेगळी ओळख निर्माण केली.
Hema Malini Career

Hema Malini Career

esakal

Updated on

विजय शिंगोर्णीकर - sakal.avtaran@gmail.com

चित्रपटसृष्टीत काही कलाकारांचा प्रवास केवळ सिनेमांच्या यादीपुरता मर्यादित राहत नाही; तर तो एका संपूर्ण काळाचा आरसा बनतो. हेमामालिनी यांचा तब्बल ६० वर्षांचा चित्रपट प्रवासही असाच बहुरंगी आणि समृद्ध राहिला आहे. आरसपानी सौंदर्य आणि नृत्याची नजाकत अशा काही गुणांच्या जोरावर ‘ड्रीमगर्ल’ने यशाची एकेक पायरी गाठली आहे. अभिनेत्री, दिग्दर्शिका, नृत्यांगना आणि समाजसेविका अशी चौफेर कामगिरी करत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं.

हेमामालिनी यांच्या चित्रपट कारकिर्दीला साठ वर्षं पूर्ण झाली, यावर आजही सहज विश्वास बसत नाही. ‘ड्रीमगर्ल’ म्हणून झालेलं त्यांचं आगमन काल-परवाच घडल्यासारखं वाटतं. राज कपूर यांच्यासोबत त्यांचा नायिका म्हणून पहिलावहिला सिनेमा आला तो म्हणजे, ‘सपनों का सौदागर’... त्याची जाहिरात करताना निर्माता अनंत स्वामी यांनी मुंबईभर चौकाचौकात भलेमोठे बॅनर्स लावले आणि त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी अक्षरे होती, ‘ड्रीमगर्ल इज कमिंग’... या सगळ्या गोष्टी अगदी काल-परवा घडल्यासारख्या वाटतात. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीची घोडदौड अशी सुरू झाली, की व्यावसायिक यश, आशयघन भूमिका आणि कलात्मक प्रयोग अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. अभिनेते धर्मेंद्र यांच्याबरोबर जुळलेली त्यांची अफलातून केमिस्ट्री, सदाबहार देव आनंद यांना दिलेली तोलामोलाची साथ, एकीकडे ‘सीता और गीता’ आणि ‘शोले’मधली अवखळ व बडबडी नायिका साकारताना उडवलेली धमाल अन् दुसरीकडे गुलजार यांच्या ‘खुशबू’, ‘किनारा’, ‘मीरा’ वगैरे चित्रपटांतील गंभीर प्रकृतीच्या कमालीच्या शांत अन् सोज्वळ भूमिका. राजिंदर सिंग बेदींच्या ‘एक चादर मैली सी’ अथवा अरुणा राजेंच्या ‘रिहाई’मधला हेमाजींचा ऑफबीट वावर, काहीशी ग्रे शेड असलेली ‘लाल पत्थर’मधली त्यांची सहनायिका किंवा मग विजय आनंद यांच्या विनंतीचा मान ठेवून ‘तेरे मेरे सपने’मधली पाहुणी कलाकार... फिल्म इंडस्ट्रीसारख्या मोहमयी ग्लॅमर वातावरणातही जाणीवपूर्वक जपलेली नृत्यकलेची आवड, खासदारकी करताना सामा‌जिक क्षेत्रात योगदान देण्याची धडपड वगैरे कितीतरी गोष्टी हेमाजींनी साठ वर्षांत केलेल्या दिसतात आणि त्या नक्कीच कौतुकास पात्र आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com