
हेमामालिनी
saptrang@esakal.com
'शोले’ चित्रपटाबाबत मी कधी विचारही केला नव्हता, की तो इतके प्रचंड यश मिळवेल. तेव्हा वाटत होते, की तोही आमच्या इतर चित्रपटांप्रमाणेच एक चित्रपट ठरेल. त्या काळात गुंड, मारामाऱ्या आदी बाबी चित्रपटांत सहज सामावलेल्या असायच्या. पण जसजसा वेळ गेला, तसे लक्षात आले, की ‘शोले’मध्ये मैत्री, प्रेम, वैर आणि भावभावनांचे एक अनोखे मिश्रण आहे, जे प्रेक्षकांच्या मनाला भिडले.
चित्रपटात प्रत्येक कलाकाराने घेतलेली मेहनत अन् त्यांचे समर्पण यांचा उत्तम मिलाफ पाहायला मिळाला आणि म्हणूनच तो एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला. कथा, पटकथा, संवाद, अभिनय आणि संगीत हे सगळे इतके प्रभावी होते, की चित्रपट एक अद्भुत अनुभव देऊन गेला.