

Urban Environmental Crisis
esakal
शर्मिला वाळुंज
कल्याण–डोंबिवली शहर आज केवळ वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणाचे उदाहरण राहिलेले नाही तर ते वाढत्या हवा, धूळ आणि जलप्रदूषणाचे गंभीर केंद्र बनत चालले आहे. एकीकडे उंचच उंच इमारती, पुनर्विकासाची धडपड, रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे, दुसरीकडे त्यातूनच निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा फटका थेट सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर बसत आहे. विशेषतः हवेतील धूलिकण (पीएम १०, पीएम 2.5) नियंत्रणाबाहेर जात असल्याने शहर ‘डेंजर झोन’मध्ये पोहोचले आहे. प्रगतीची चिन्हे सर्वत्र दिसतात; मात्र या विकासाची किंमत नागरिकांना श्वासातून मोजावी लागत आहे.