

Himalayan Glacier Conservation
esakal
सकाळी सूर्य उगवला की हिमनदीच्या पृष्ठभागावरून टपटप थेंब गळू लागतात आणि काही तासांत ते थेंब प्रवाह बनतात. तेच प्रवाह खाली जाऊन नदी बनतात. नद्या गावांना, गावं जिल्ह्यांना आणि जिल्हे देशाला जगवतात. हिमनद्या या जलसिंचनाचे केंद्र, हायड्रोपॉवरचे मूलस्थान, कृषीचक्राचा पाया, पूर-दुष्काळाच्या संतुलनाचा तोल सांभाळणाऱ्या घटक आहेत... विशेष म्हणजे फक्त भारतीय उपखंडामध्ये हिमनद्या या दोन अब्ज लोकांच्या पाण्याचा स्रोत सांभाळणाऱ्या आहे.