
अमोघ वैद्य
ठाणाळे लेण्यातील जवळपास प्रत्येक दालनात बौद्ध भिक्षूंसाठी निवासाची सोय होती हे तेथील विहारांवरून दिसून येतं. या दालनांमध्ये झोपण्यासाठी कोरलेली बाकं आणि पणती ठेवण्याची जागा यांचे बारकावे डोळ्यांत भरतात.
मुख्य विहारात ब्राह्मी लिपीतील शिलालेख, दानशूर लोकोत्तर लोकांचे गुणगान गात आजही सुस्थितीत आहेत. मुख्य दालनाच्या छतावरील शिल्पकाम कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे.