

Medical Ethics Crisis
esakal
विठ्ठल काळे - mailvitthalkale@gmail.com
समाजाची सेवा करणं हा हॉस्पिटलचा मुख्य हेतू असावा, ना की नफा कमावणं. हॉस्पिटल्सने विश्वास कमावला पाहिजे; निव्वळ नफा नव्हे... जरी नफा कमवायचा असेल तर त्याला मर्यादा असाव्यात.
हेका घडलं? याला जबाबदार कोण? विज्ञान हे मानवाच्या मदतीसाठी निर्माण झालं होतं ना? मग मदत करणारं विज्ञान माणसाच्या फसवणुकीसाठी का वापरलं जाऊ लागलं आहे?
शेजारी राहणारे शिंदे काका बागेत मॉर्निंग वॉक करत पोटतिडकीने मला विचारत होते. मी त्यांना शांत करत विचारलं, ‘अहो, काय झालं ते तरी सांगा आधी.’ बागेतील एका बाकावर आम्ही दोघं बसलो. त्यांचा श्वास चांगलाच वर-खाली होत होता. शिंदे काका माझ्या परिचयातील अत्यंत हुशार मनुष्य. प्रत्येक गोष्टीवर सारासार विचार करणारे. आपलं मत देण्याची घाई न करणारे. अभ्यासू व्यक्तिमत्त्व. ते काहीतरी सांगत आहेत म्हणजे महत्त्वाचं असणारच.