
आभा भागवत
‘एआय’ला तुम्ही एखाद्या चित्रकाराची आतापर्यंत काढलेली सर्व चित्रं दिली, तर पुढचं चित्र ‘एआय’ तयार करेल. मग माणसांनी करायचं काय? यातून मार्ग काढण्यासाठी चित्रकारांनाच काय, इतर अनेक क्षेत्रातील लोकांना ‘एआय’ला जे करता येतं त्याच्या पलीकडं आपण काय करू शकतो याचा शोध घेत राहावं लागेल. ‘घिबली’सारख्या आक्रमणांत ‘एआय’च्या क्षमतांना न घाबरता त्यांचा आपल्या कामात डौलदारपणे वापर करावा लागेल.