शासनाकडून नेहमी माहितीची देवाणघेवाण होत असते. ही माहिती वेगवेगळ्या स्वरूपात मागवली जाते. प्रत्येक वेळेला ही माहिती संकलित करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वेळ आणि मनुष्यबळ खर्ची पडत असे. एआयसारख्या आधुनिक तंत्राचा वापर करून हे मनुष्यबळ वाचविण्यात यश आलेले आहे. या वाचलेल्या मनुष्यबळाचा वापर आम्ही इतर कामासाठी आहोत. यातून आयुक्त स्तरावरील कामकाजात कमालीचा फरक दिसत आहे.
कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे येतात. मुंबईसारखी आर्थिक राजधानी, औद्योगीकरण, विविध विकासकामे, लोकसंख्येची घनता आणि बहुभाषिकांचा प्रदेश यामुळे येथील समस्याही वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाचा कारभार गतिमान करण्यावर विशेष भर दिला. या समस्यांच्या मुळाशी जात आधुनिक तंत्राचा वापर करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.