
ब्रिजेश सिंह
Brijeshbsingh@gmail.com
कृत्रिम बुद्धिमत्ता कायद्याच्या क्षेत्रात एक मोठे परिवर्तन घडवून आणत आहे. एका अंदाजानुसार २०३० पर्यंत वकिलांच्या पारंपरिक कामांपैकी ४० टक्के कामे एआयच्या प्रभावाखाली येतील. हे तंत्रज्ञान वकिलांची जागा घेणार नाही, तर त्यांना एक शक्तिशाली सहाय्यक म्हणून मदत करेल. कायद्याच्या क्षेत्रातील ही एआय क्रांती केवळ एक सुरुवात आहे.
जच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवत आहे. आरोग्य, शिक्षण, मनोरंजन आणि उद्योगानंतर आता हे तंत्रज्ञान कायद्याच्या आणि वकिलीच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रातही आपले पाय रोवत आहे.