
माधव गाडगीळ
आजच्या शिक्षणव्यवस्थेतून १५ टक्के आर्थिक सुस्थितीतील लोक आणि इतर मुख्यतः ग्रामवासी ८५ टक्के जनता यांच्यातील दरी रुंदावते आहे. सुस्थितीतील लोकांच्या मुलांना इंग्रजी शिकण्यात काहीच अडचण नाही; पण ग्रामवासीयांना हा मोठ्या प्रमाणात अडसर आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामवासीयांच्या शिक्षणाचा दर्जा नेटकेपणे उंचावता येईल.
आज कृत्रिम बुद्धिमत्तेचे – गावरान भाषेत - खोट्या-नाट्या अकलेचे तारे तुटताहेत आणि एक अफलातून भाषाव्यवहाराची आणि ज्ञानव्यवहाराची क्रांती घडतेय. उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांची चर्चा करताना सुचवले होते की, जगातील सर्व ज्ञान ज्यांच्या त्यांच्या भाषेत सगळ्यांकडे पोचवले जाणे हा शेवटचा टप्पा असेल.