
“मी कसं वागते, काय करते हे मीच ठरवते. इतर कुणालाही माझ्या सारखा विचार करता येणार नाही. कारण मला फक्त मीच ओळखते.”
हो. तुम्हालाही पूर्वी असं वाटत असेल तर ते बरोबरच होतं. पण आता जरासा बदल झालाय. म्हणजे, तुम्ही नेमकं कसं वागता, तुमच्या डोक्यात काय चालू असतं, तुम्ही काय विचार करत असता हे सगळं आता अजून कोणीतरी सांगू शकणार आहे. एखाद्या ठराविक परिस्थितीत तुम्ही काय निर्णय घ्याल हेही आता दुसरं कोणीतरी सांगू शकणार आहे. कोण म्हणजे काय, आपलं AI!
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता प्रत्येकच क्षेत्रासारखं मानसशास्त्रातसुद्धा आता व्यवस्थित उतरू पाहतंय. ‘माणसाचा मेंदू, त्याचं मन AI ला पूर्णपणे ओळखता येत नाही’ हा समज आता बदलणार आहे. कारण Centaur नावाचं एक AI मॉडेल आता माणसाचा स्वभाव आत्मसात करून, कुठल्या प्रसंगात एखादा कसं वागेल हे सांगतोय. पण कसं? काय आहे हे Centaur? आणि त्याला हे सगळं कसं जमतंय बरं? या बद्दल सविस्तर वाचा ‘सकाळ प्लस’च्या या विशेष लेखात...