Things are not happening as you want..? : आपण आयुष्यात खूपदा अपेक्षा ठेऊन जगत असतो.. म्हणजे आज मी जरा वेगळ्या पद्धतीने भाजी बनवून पाहिली आहे तर आज तिचं कौतुक होईल किंवा ऑफिसमध्ये माझं प्रमोशन होईल... पण सगळंच तुमच्या अपेक्षेप्रमाणं होतं का..? तर नाही. काही गोष्टी अपेक्षेपेक्षा जास्त काहीतरी देऊन जातात. तर काही गोष्टीत मोठा अपेक्षाभंग होतो. पण या काळात मेंदूत काय होतं.. ?
मानसशास्त्रात यासाठी एक संकल्पना सांगण्यात आली आहे. ज्या वेळी वास्तव आणि अपेक्षा यामध्ये फरक असतो त्याला मानसशास्त्रीय भाषेत 'रिवॉर्ड प्रेडिक्शन एरर' म्हंटलं जातं. हाच फरक आपल्या मेंदूला शिकवत असतो आणि वागायला भाग पाडत असतो.
जेव्हा या गोष्टी तुमच्या बाबतीत घडतात, त्यावेळी मेंदूत काय बदल होतात.. ? तुमच्या भावना आणि मेंदू यांचे कसे कनेक्शन असतं.? शरीरात यामुळे काही हार्मोनल बदल होतात का..? आणि ही संकल्पना तुम्हाला काय शिकवून जाते..? हे सगळं जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून..