
डॉ. कुलदीपसिंह राजपूत
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या ताज्या अहवालाने देशांतर्गत स्थलांतरातील बदलाचे महत्त्वपूर्ण कल मांडले आहेत. त्यानुसार अंतर्गत स्थलांतर धीमे होत असून त्यासाठी केंद्राच्या विकासयोजना कारणीभूत असल्याचे नमूद केले आहे. या अहवालात न मांडलेल्या अन्य घटकांची चर्चाही आवश्यक आहे.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने नुकताच ‘४०० मिलियन ड्रीम्स’ नावाचा संशोधनअहवाल प्रकाशित केला. त्यानुसार, अंतर्गत स्थलांतर मंदावत आहे. हा महत्त्वाचा कल आहे. देशातील एकूण अंतर्गत स्थलांतरितांची संख्या २००१ च्या जनगणनेनुसार ३१. ४५ कोटी होती. २०११ च्या जनगणनेत त्यात लक्षणीय वाढ दिसली. ती ४५.५७ कोटी झाली. हा कल बदलत आहे.२०२३पर्यंत अंतर्गत स्थलांतरितांची संख्या घटून ४०.२० कोटी झाल्याचा अंदाज आहे.