
पुणे : गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने नवीन शॉपिंग फिचर लाँच केले आहे. या नवीन AI मोडच्या माध्यमातून Google प्लॅटफॉर्मवर जगभरातील मोठमोठ्या ब्रँड्ससह छोट्या व्यापाऱ्यांची ५० अब्जांहून अधिक वेगवेगळी उत्पादने उपलब्ध असणार आहेत. पण हे फक्त सर्च इंजिन किंवा प्लॅटफॉर्म नसेल तर AI मुळे एका मोठ्या आभासी दुकानाप्रमाणे (virtual shopping assistant) काम करणार आहे. म्हणजेच एकाच व्यासपीठावर ग्राहकांना करोडो पर्याय उपलब्ध असणार असून त्याचे आकार, रंग, उंची उपलब्ध असणार आहे. तसेच यातील अनेक उत्पादने ही ग्राहकांना आभासी पद्धतीने पडताळून देखील घेता येणार आहे.
पण यामुळे अनेक छोटे व्यावसायिक आणि ई कॉमर्स विषयात विविध सेवा देणाऱ्या कंपन्या आणि स्टार्टअपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काय आहे हे गुगलचं हे नवं शॉपिंग टूल? ते कसं काम करणार?, त्यामुळे या छोट्या तांत्रिक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना कसा फटका बसू शकेल? आणि सध्या हे कोणत्या देशात सुरु आहे हे सगळं जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या माध्यमातून..